शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी परतणार मूळ शिक्षक पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:22 IST

वाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने तुमराम यांना शिक्षणाधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याला शालेय शिक्षण विभागाने ७ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. एकिकडे पदोन्नतीने कार्यकारी पद मिळविण्यासाठी चढाओढ असताना, काही अधिकारी मात्र कार्यकारी पदाऐवजी मूळ पदावरच समाधान मानतात. मूळ पदावरच समाधान मानणाºया अधिकाºयांच्या रांगेत तुमराम असून, वाशिम येथे शिक्षणाधिकारी पदावर रूजू होण्यापूर्वी ते आदिवासी विकास विभागांतर्गत येणाºया शाळेवर माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते. कौटुंबिक कारण तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रममान असलेले तुमराम यांना शिक्षणाधिकारी  पदात फारशी रूची वाटलीच नाही. या कारणास्तव त्यांनी परत माध्यमिक शिक्षक या मूळ पदावर जाण्यासाठी  महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने १६ आॅगस्ट २०१८ रोजीच्या आदेशानुसार आदिवासी विकास अमरावतीचे अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून तुमराम यांना रूजू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अप्पर आयुक्तांनी ५ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा झटाळा ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे इतर विषयाच्या माध्यमिक शिक्षकाच्या रिक्त जागेवर तुमराम यांना पदस्थापना दिली. आश्रम शाळेवर माध्यमिक शिक्षक म्हणून रूजू होण्यासाठी तुमराम यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावरून कार्यमुक्त करण्यास शालेय शिक्षण विभागाने ७ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता तुमराम हे परत माध्यमिक शिक्षक या मूळ पदावर जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात डी.ए. तुमराम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक