कडक निर्बंधांना वाशिमकरांचा दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 17:03 IST
Lockdown in Washim : जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
कडक निर्बंधांना वाशिमकरांचा दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' मिशनअंतर्गत शुक्रवार, रात्री ८ वाजतापासून लागू झालेल्या कडक निर्बधांना दुसऱ्या दिवशीही रविवारी वाशिमकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बध आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडीकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवाशी वाहतूक व आॅटो वाहतूक आदींना वगळण्यात आले.शुक्रवार, ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून लागू झालेल्या कडक निर्बधांना ११ एप्रिल रोजी दिवसभर चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती.