शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जून्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनेचा लढा : नागपूरच्या मोर्चात वाशिमकरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:11 IST

वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले.

ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी भव्य महाआक्रोश मुंडन मोर्चा काढला होता.मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते .

वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते तसेच यापुढेही लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेचे वाशिम येथील पदाधिकारी हरिष चौधरी यांनी मंगळवारी सांगितले.

१९८२-८४ ची जुनी पेंशन योजना आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कर्मचाºयांना नवीन पेन्शन योजनेतून कायमस्वरुपी सवलती मिळणार नाहीत. हा एकप्रकारे कर्मचाºयांवर अन्याय असून, जूनी पेन्शन योजना लागू करणे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी भव्य महाआक्रोश मुंडन मोर्चा काढला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातूनही कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपला आक्रोश शासनापर्यत पोहचविण्यासाठी जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंडनही केले. या नवीन पेंशन योजनेत मयत झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जुनी पेंशन हक्क संघटना पुर्ण ताकदीनीशी या आंदोलनात उतरली होती. यापुढेही हा लढा तिव्र केला जाईल, असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाºयांनी केला.  विधीमंडळातील बहुतांश आमदार जुनी पेंशन योजना लागु करण्याचे आश्वासन देतात पण सभागृहात प्रभावीपणे मुद्दा का मांडला जात नाही? पाच वषार्साठी निवडुन आलेले लोकप्रतिनिधी आयुष्यभर पेंशन घेतात, तर आयुष्यभर सेवा करणाºया कर्मचाºयांना किती पेंशन मिळणार ? याचं उत्तर शासनाकडून घेण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केला जात आहे, असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. नागपूर येथील आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे, विनोद काळबांडे, गोपाल लोखंडे, निलेश कानडे, अनिल मडके, रामप्रसाद धनुडे, शंकर गोविंदकर, किशोर कांबळे, हरिश चौधरी, श्रीकांत बोरचाटे, गजाजन ढोबळे, सुनील वानखेडे, बालाजी फताटे, गणेश महाले, गोविंद पोतदार, नीलेश मिसाळ, मिलींद इंगळे, सतीष शिंद यासह संघटनेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिम