शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमकरांना आवडतो ९९९, फॅन्सी नंबरसाठी मोजले १७ लाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:41 IST

यामधून परिवहन विभागाला १६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  फॅन्सी वाहन क्रमांकाची क्रेझ कायम असून, ९९९, ९९९९, ७७७७, ४१४१, ९४९४ आदी क्रमांकांना जास्त पसंती दिली जात आहे. चालू आर्थिक वर्षात २२० फॅन्सी वाहन क्रमांकाची विक्री झाली असून, यामधून परिवहन विभागाला १६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. स्वत:ची पसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा मोजण्याची तयारी असणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले. यामधून वाहनांना द्यावयाचा परवाना क्रमांकही सुटू शकला नाही. ग्राहकांची पसंती पाहून परिवहन विभागाने व्हीआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे  क्रमांक आरक्षित करून त्याला ‘किंमत’ दिली. फॅन्सी वाहन क्रमांकांच्या शुल्कात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते मार्च २०१९ या काळात जिल्ह्यात ४२१ फॅन्सी वाहन क्रमांकाची विक्री झाली. यामधून ३१ लाख २४ हजार रुपयांचा महसूल हा परिवहन विभागाला मिळाला. ९९९, ९९९९, ९४९४, ९०९०, ७७७७, ७७७, ४१४१, ७, १११ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी आहे. यंदा कोरोनामुळे सुरुवातीच्या एप्रिल ते मे महिन्यादरम्यान अर्थचक्र ठप्पच होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रशासकीय कामकाजही एप्रिल ते मे महिन्यात प्रभावित झाले होते. जून महिन्यापासून कामकाज पूर्ववत होताच, वाहनमालकांनी मनपसंद व आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांत २२० जणांनी मनपसंद क्रमांक घेतले असून, यासाठी १६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे.

विशिष्ट वाहन क्रमांक आरक्षित करण्यात आले असून, या क्रमाकांसाठी शासन नियमानुसार शुल्क आकारले जाते. गेल्या वर्षी ४२१ क्रमांकाची विक्री झाली असून, यामधून ३१ लाख २४ हजार रुपयाचा महसूल मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२० वाहन क्रमांकाची विक्री झाली.- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस