शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करण्यात वाशिम जिल्हा परिषद विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:04 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. मार्च २०१९ पूर्वीच खर्च करून ३०० दिव्यांग बांधवांना घरकुल तसेच १७० बचत गटांना फिरते भांडवल उपलब्ध करून दिले आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी पंचायत राज संस्थांना स्वत:च्या उत्पन्नातून यापूर्वी ३ टक्के निधी खर्च करण्याचा नियम होता. यामध्ये बदल केला असून त्यानुसार हा निधी आता ५ टक्के करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेला स्वतंत्र दिव्यांग कल्याण निधी तयार करावा लागला आहे. हा निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. निधी खर्च न झाल्यास शिल्लक निधी जिल्हा अपंग निधीमध्ये जमा करण्याचे निर्देशही ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या. पण काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगांना काही योजनांपासून वंचित राहावे लागत होते. दिव्यांगांच्या व्यक्तिगत व सामूहिक विकासाच्या योजनांचे नियोजन करून योजना राबविताना यापूर्वी कानाडोळा झाल्याने वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी राखीव निधी पूर्णपणे खर्च होत नव्हता. याला कुठेतरी आळा बसावा, या दृष्टिकोनातून सन २०१८-१९ या वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व समाजकल्याण सभापती पानुताई दिलीप जाधव यांनी दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी १०० टक्के खर्च करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नियोजन करीत अंमलबजावणीही करण्यात आली. चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला ४७ लाख रुपये निधी १०० टक्के खर्च करण्यात आला असून सुमारे ३०० दिव्यांग बांधवांना घरकुल तसेच १७० बचत गटांना फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. चालू वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला निधी १०० टक्के खर्च करणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात अव्वल ठरली आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद