शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:17 AM

Washim ZP शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना सन २०१९-२० या वर्षात शासनाकडून १३४ कोटींचा निधी प्राप्त झाला. गत २३ महिन्यांत अर्थात फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५९ कोटी रुपये खर्च झाले असून, शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला शासनाकडून विविध माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. या निधीतून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. वाशिम जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे अंदाजपत्रक जवळपास १० कोटींच्या घरात असते. या निधीतून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचविणे शक्यच नाही. स्वनिधीबरोबरच जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. जिल्हा परिषदेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसल्याचा दावा एकीकडे केला जातो, तर दुसरीकडे दरवर्षी निधी अखर्चित राहत असल्याचे चित्रही पाहावयास मिळते. सन २०१९-२० या वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना जवळपास १३४ कोटींचा निधी मिळाला. हा निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्ष असून, ३१ मार्च २०२१ पूर्वी संपूर्ण निधी खर्च होणे बंधनकारक आहे. यानंतर अखर्चित राहणारा निधी शासनजमा केला जातो. १३४ कोटींपैकी आतापर्यंत ५९ कोटी रुपये खर्च झाले असून, शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे. विहित कालावधीत निधी खर्च करण्याचे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. आता एका महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे. 

निधी खर्च करताना या विभागांची होणार दमछाक!सन २०१९-२० या वर्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, जलसंधारण या विभागांना शासनाकडून निधी मिळाला होता. सद्यस्थितीत प्रत्येक विभागाचा निधी काही प्रमाणात अखर्चिक असून, मार्च २०२१ पूर्वी खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी एका महिन्यात खर्च करताना संबंधित विभागांची चांगलीच दमछाक होणार आहे.

जिल्हा परिषदेला सन २०१९-२० या कालावधीत प्राप्त झालेला निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २०२१ अशी आहे. सध्या शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपूर्वी पूर्णपणे खर्च कसा होईल, याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे.- मंगेश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना प्राप्त झालेला निधी विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे. निधी अखर्चिक राहून शासनजमा होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. १० मार्चपर्यंत पुन्हा आढावा घेऊन ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या जातील. - चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिम