शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Washim ZP Election :  सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजूळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:34 IST

महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद निवडणुकीत कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जूळवाजूळव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह वाशिम जिल्हा जनविकास आघाडी, भारिप-बमसंने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.५२ सदस्य संख्या असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राकाँने अपक्षाच्या मदतीने सत्ता उपभोगली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्य संख्या आवश्यक असून, महाविकास आघाडीचे संख्याबळ २७ असे आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. सर्वाधिक जागा पटकाविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या रुपात अध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार असल्याने, कोणत्याही परिस्थितीत राकाँ अध्यक्षपद सोडणार नाही, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमधूनच वर्तविला जात आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी हा प्रयोग यशस्वी होणार की नाही याबाबत राजकीय गोटातून साशंकता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर अद्याप महाविकास आघाडीसाठी कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत, असे राकाँच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद व दोन विषय समिती सभापतीपद देऊन उपाध्यक्ष व उर्वरीत दोन सभापती पदे पदरात पाडून घेण्याची खेळी जनविकास आघाडी व भारिप-बमसंकडून होऊ शकते, असेही राजकीय गोटातून बोलले जात आहे. जिल्हा जनविकास आघाडीशी युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याचे भारिप-बमसंच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जनविकास आघाडी व भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेकडून ऐनवेळी राकाँशी समझोताही होऊ शकतो, असाही राजकीय अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषद