शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जि. प. व पं.स. निवडणूक : ३९६ उमेदवारांची माघार; ७६९ रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:05 IST

निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून १७६ आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतून २२० असे एकूण ३९६ नामांकन सोमवार, ३० डिसेंबर रोजी मागे घेण्यात आले; तर ७२४ नामांकन अर्ज कायम राहिले आहेत. दरम्यान, ही प्रक्रिया पार पडण्यासोबतच निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी येत्या ७ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामीण भागातील राजकीय पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व उमेदवारांनी जय्यत तयारी केलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र लढण्यासंबंधी ठोस निर्णय न झाल्याने तीन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूकीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जिल्हा जनविकास आघाडीनेही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये दमदार ‘एन्ट्री’ मारण्याकरिता आपापल्या स्तरावर रणनिती आखली आहे.गत पाच वर्षात विविध राजकीय पक्षांचे संघटन वाढविण्यासाठी अहोरात्र झटलेल्या काही कार्यकर्त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने बंडखोरीचा प्रकार उफाळून आला आहे. परिणामी, सर्वच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये अपक्षांची संख्या देखील तुलनेने वाढल्याचे दिसून येत आहे.सोमवारी वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० गटांमध्ये दाखल ८२ अर्जांपैकी ३२ अर्ज मागे घेण्यात आले; तर ५० अर्ज कायम राहिले. पंचायत समितीच्या २० गणांमधून दाखल ११३ अर्जांपैकी ३६ अर्ज मागे घेण्यात येऊन ७७ अर्ज कायम राहिले. मालेगाव तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांमध्ये दाखल ९९ अर्जांपैकी ४६ अर्ज मागे घेण्यात आले; तर ५३ अर्ज कायम राहिले. पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये दाखल १२६ अर्जांपैकी ३८ माघार होऊन ८८ कायम राहिले. रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांमध्ये दाखल ६४ अर्जांपैकी २१ माघार, ३७ रिंगणात. पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये दाखल १३२ अर्जांपैकी ४८ माघार, ७२ अर्ज कायम राहिले. मानोरा तालुक्यातील जिल्हा पषिदेच्या ८ गटांमध्ये दाखल ७० अर्जांपैकी ३१ माघार, ३९ कायम. पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल १२५ अर्जांपैकी ३७ माघार, ८२ अर्ज कायम राहिले. मंगरूळपीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ गटांमध्ये दाखल ५८ अर्जांपैकी २३ माघार, ३५ कायम. पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल ११७ अर्जांपैकी ४७ माघार; तर ७० अर्ज कायम राहिले. यासह कारंजा तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांमध्ये दाखल झालेल्या ७२ अर्जांपैकी २३ माघार, ४९ कायम आणि पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल ८६ अर्जांपैकी १४ अर्ज मागे घेण्यात येऊन ७२ अर्ज कायम राहिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद