शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Washim ZP : विषय समित्यांसाठी चढाओढ; निवडीला उरला एक दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:52 IST

भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापती पदासाठी २९ जानेवारी रोजी निवडणूक होत असून, अद्याप कोणत्या पक्षाला कोणती विषय समिती द्यावयाची याचा निर्णय होऊ शकला नाही. २८ जानेवारी रोजी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारिप-बमसंशी हातमिळवणी करून विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविले. अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद काँग्रेसकडे आल्याने आता विषय समितीच्या निवडणुकीत महत्त्वाची समिती मिळावी यासाठी शिवसेना व भारिप-बमसं आग्रही असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पांडूरंग ठाकरे किंवा माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या गटातील सदस्याचे नाव २८ जानेवारी रोजी निश्चित होण्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. काँग्रेसकडून तुर्तास चक्रधर गोटे, दिलीप मोहनावाले यांची नावे स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून माजी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते. रिसोड विधानसभा मतदारसंघातील सदस्याकडे सभापती पद जाण्याची शक्यता आहे.महत्त्वाच्या समितीवर सेना, भारिप ठापजिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण अशा चार विषय समित्या आहेत. या चार विषय समितीमध्ये शिक्षण व आरोग्य, समाजकल्याण या महत्त्वाच्या समितीसाठी शिवसेना, भारिप-बमसं ठाम असल्याचे वृत्त आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं अशा चार पक्षांना प्रत्येकी एक सभापती पद दिले जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणते सभापती पद द्यावे, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. २८ जानेवारीच्या समन्वय बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध झाली; त्याचप्रमाणे विषय समिती सभापती पदाची निवडणूकदेखील अविरोध कशी होईल, यावर महाविकास आघाडी व भारिप-बमसंचा भर आहे.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसजिल्हा परिषद विषय समिती वाटप अजून निश्चित झाले नाही. महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंच्या समन्वयातून विषय समितीचे वाटप ठरणार आहे. २८ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक होऊ शकते.- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईकजिल्हाध्यक्ष, काँग्रेसजिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटपासंदर्भात उद्या बैठक होऊ शकते. या बैठकीत कोणती विषय समिती कोणत्या पक्षाला द्यावयाची, याचा निर्णय होईल. तुर्तास तरी विषय समिती वाटप ठरलेले नाही.-डॉ. नरेश इंगळेमहासचिव, भारिप-बमसं

नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटप ठरले आहे. शिवसेनेला जी समिती हवी आहे, ती समिती मिळणार आहे. महाविकास आघाडी व भारिप-बमसंची सत्ता येईल, असा विश्वास आहे.- सुरेश मापारीजिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिम