शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:27 IST

वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी मैदानी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती यमुना जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मैदानी तसेच सांघिक स्पर्धा झाल्या. सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध प्रकारचे गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. कबड्डी, खो-खो व अन्य स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय संघांनी सहभाग नोंदविला.विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या दौर्‍यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या क्रीडा स्पर्धा, तसेच सांस्कृतिक महोत्सव लांबणीवर पडला होता. पंचायत राज समितीच्या दौर्‍यानंतर आता क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव असल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये उत्साह दिसून येतो. पहिल्या दिवशी दिवसभर जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामसेवक कर्मचारी युनियन, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पशू वैद्यकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कृषी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, लेखासंवर्गीय कर्मचारी संघटना यासह विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ३0 जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ होईल. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमzpजिल्हा परिषदSportsक्रीडा