शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद : १५ पैकी ७ विभाग प्रमुखांची पदे रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:52 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या १५ पैकी तब्बल सात विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या १५ पैकी तब्बल सात विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येते. रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप रिक्त पदांचे ग्रहण सुटले नाही. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाचा विकास साधला जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी केली जाते. अलिकडच्या काळात शासनाकडून जिल्हा परिषदेचे महत्व कमी केले जात असल्याचे दिसून येते. योजना राबविणारी एजन्सी म्हणूनच याकडे पाहिले जात आहे. शासनाकडून मिळणाºया निधीतही कपात होत आहे तर दुसरीकडे नवनवीन उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीची भर पडत आहे. अंमलबजावणीसाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने तसेच महत्त्वाची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्याची कसरत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना करावी लागत आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सन २०१४ पासून कायमस्वरुपी प्रकल्प संचालक नाहीत. सदर पद रिक्त असल्याने प्रभारींच्या खांद्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय कापडनीस यांची बदली झाल्यापासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार कारंजाच्या गटविकास अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रमोद कापडे सेवानिवृत्त झाल्यापासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्तच आहे. बांधकाम, लघुसिंचन व ग्रामीण पाणीपुरवठा अशा तिन्ही विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. या पदांचा प्रभार अन्य अभियंत्यांकडे सोपविला आहे. कृषी विकास अधिकारी, चार बालविकास प्रकल्प अधिकारी, तीन तालुका आरोग्य अधिकारी, दोन पशूधन विकास अधिकारी, ११ पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तीन, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) तीन पदे, आदी प्रमुख अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाला गती देताना नाकीनऊ येत आहे. वर्ग एक व दोनच्या अधिकाºयांची पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, ही बाब शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येते. या आठ विभागांना आहेत नियमित प्रमुख जिल्हा परिषदेच्या आठ विभागांना नियमित विभाग प्रमुख आहेत. यामध्ये पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य, पंचायत, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग अशा आठ विभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. - दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद