शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद : महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:45 IST

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे.

वाशिम - राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे. त्यामुळे सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांकरिता ३० एप्रिल २०१९ रोजी दुपारी १२ वाजता वाशिम येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) आरक्षणाबाबत सोडत २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने २९ आॅगस्ट २०१८ रोजी स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ३० मार्च २०१९ रोजीच्या पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार, महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता काढण्यात आलेले आरक्षण अबाधित ठेवून वाशिम जिल्हा परिषदेच्या केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ३० एप्रिल २०१९ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी या सोडत सभेला उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसाठी यापूर्वी २७ आॅगस्ट २०१८ रोजी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात बदल प्रस्तावित नसल्यामुळे या आरक्षण सोडतीची माहिती ३० एप्रिल २०१९ रोजी त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयासाठी माहितीकरिता उपलब्ध राहील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची व प्रारूप प्रभाग रचनेची माहिती २ मे २०१९ रोजी अधिसूचने अन्वये प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिम