शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:36 IST

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी राज्याच्या अवर मुख्य सचिवांकडे ३ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रणेला महत्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, आठ पशुधन विकास अधिकारी, दोन गटविकास अधिकारी, दोन सहायक गटविकास अधिकारी, तीन तालुका आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे २९, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत असून अनेक विकासात्मक कामे रखडत आहेत तर काही कामांचे ‘रिझल्ट’ अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचे दिसून येते. विभागप्रमुखांची पदेच रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या गतीला ‘ब्रेक’ लागत आहेत. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोन दर्जाच्या अधिकाºयांचे बदली सत्र शासनस्तरावर सुरू आहे. त्याअनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेतील अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सोमवारी अवर मुख्य सचिवांकडे केली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद