शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:16 IST

Washim Zilla Parishad अर्थसंकल्प सादर कोण करणार यावर सध्या मंथन सुरू असून याबाबत दोन, तीन दिवसात निर्णय होण्याचे विश्वसनीय सूत्र आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्याने आणि यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांसह अर्थ सभापतींचाही समावेश असल्याने जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर कोण करणार यावर सध्या मंथन सुरू असून याबाबत दोन, तीन दिवसात निर्णय होण्याचे विश्वसनीय सूत्र आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदभार्तील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे या पदाधिकाºयांचा समावेश आहे. अध्यक्षांचे पद रिक्त झाल्याने या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांच्याकडे मंगळवारी सोपविण्यात आला. दरम्यान, दरवर्षी मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर चर्चा होऊन सभागृहाची मंजूरी मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय सभा बोलाविण्यात येते. १९ मार्च रोजी ही सभा जवळपास निश्चित झाली होती. परंतू, तत्पूर्वीच न्यायालयीन निर्णयानुसार तीन पदाधिकाºयांसह १४ सदस्यांची पदे रिक्त झाल्याने ५ ते ९ मार्च या दरम्यान अर्थसंकल्पीय सभेबाबत कोणतेही नियोजन होऊ शकले नाही. ९ मार्च रोजी उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आल्याने या विषयावर १० मार्च रोजी साधकबाधक चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दरवर्षी अर्थ सभापती हे अर्थसंकल्प सादर करीत आले आहेत. न्यायालयीन निर्णयामुळे अर्थ सभापती विजय खानझोडे यांचे सदस्य पद रद्द झाल्याने यंदा पहिल्यांदाच अर्थ सभापती अर्थसंकल्प सादर करू शकणार नाहीत. अर्थसंकल्प सादर कोण करावा? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. येत्या दोन, तीन दिवसात यावर निर्णय होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे १९ मार्च रोजीची नियोजित सभाही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात !सन २०२१-२२ या वर्षातील जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तत्कालिन अर्थ सभापती विजय खानझोडे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाºयांनी गत एका महिन्यापासून नियोजन केले होते. अर्थसंकल्प पुर्णत्वाकडे येत असतानाच, न्यायालयीन निर्णयामुळे अध्यक्ष व अर्थ सभापतींचे सदस्य पद रद्द झाल्याने अर्थसंकल्पाचे नियोजनही ठप्प झाले. ९ मार्च रोजी उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आल्याने आपसूकच अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण या विषय समितीचे अधिकारही त्यांना प्राप्त झाले. अर्थसंकल्पाला अंतिम रुप देण्याची कार्यवाही येत्या दोन, चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय सभा निश्चित होणार असल्याचे वृत्त आहे.

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा यापूर्वी १९ मार्च रोजी निश्चित झाली होती. ४ मार्च रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील १४ सदस्यांची पदे रिक्त झाल्याने अर्थसंकल्पीय सभा नियोजित तारखेला घ्यावयाची की दुसरी तारीख ठरवायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पदाधिकारी व सदस्यांशी चर्चाविनिमय करून याबाबत दोन, तीन दिवसात निर्णय घेतला जाईल. सभागृहात अर्थसंकल्प कुणी सादर करावा, याबाबत अद्याप काही निश्चित झाले नसून, यावर सध्या चर्चा सुरू आहे. -डॉ. शाम गाभणेप्रभारी अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिम