शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : प्राथमिक शाळांना संच मान्यतेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:01 IST

वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या यासंदर्भातील संदेश ‘व्हायरल’ झाला. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसंच मान्यता मिळाल्याच्या सोशल मीडियावर संदेश शिक्षक संभ्रमात 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या यासंदर्भातील संदेश ‘व्हायरल’ झाला. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे व संच मान्यतेचे सुधारित निकष ८ जानेवारी २0१६ च्या शासन निर्णयाने स्पष्ट केले आहेत. शैक्षणिक संस्थांमधील कामांचा दर्जा राखला जावा व कार्यसिद्धी होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी संख्या व भौतिक सुविधांनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संख्या निश्‍चित केली जाते. ही संख्या निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेला ‘संच मान्यता’ म्हटले जाते. शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयांपैकी शिकविले जाणारे अनिवार्य विषय व ऐच्छिक विषय यानुसार शिक्षक नियुक्त केले जातात. शाळांमधील विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा आदींच्या अनुषंगाने दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने संच मान्यतेची प्रक्रिया राबविली जाते. सन २0१७-१८ या वर्षातील संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, असे वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तथापि, ‘व्हॉट्स अँप’सारख्या सोशल मीडियावर संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संख्येसंदर्भात एक संदेश ‘व्हायरल’ झाला आहे. या संदेशानुसार, राज्यात ४0९२ शिक्षक अतिरिक्त ठरले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ३0८ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या ‘व्हॉट्स अप’ ग्रुपवरही हा संदेश फिरत असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांना विचारले असता, सन २0१७-१८ या वर्षातील संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती निश्‍चित नाही. या संदेशासंदर्भात शिक्षण विभागाकडून अद्याप कोणत्याही सूचना नाही. कदाचित हा संदेश ‘फेक’ असू शकतो, असे मानकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक