शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जिल्ह्यातील तूर उत्पादकांना नाफेड खरेदीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:50 IST

वाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, या शेतक-यांना आता नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षा लागली आहे.

ठळक मुद्देबाजारात अल्पदरजिल्ह्यात ९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, या शेतक-यांना आता नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षा लागली आहे.खरीप हंगामातील तुरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे; परंतु व्यापाºयांकडून बाजारात हमीदरापेक्षा तब्बल हजार रुपये कमी दर देण्यात येत आहेत. शासनाने तुरीला बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीदर निश्चित केले असताना बाजारात मात्र व्यापा-यांकडून ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना उसणवारी परत करणे, घराचा गाडा ओढणे, लग्न सोहळ्याच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने हे शेतकरी नाईलाजास्तव बाजारात तूर विकत आहेत. दर दिवसाला जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या मिळून सरासरी ३० हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. शासनाकडून नाफेड खरेदीची घोषणा केल्यानंतर शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत; परंतु गत आठ दिवसांपासून या शासकीय तूर खरेदीसाठी शेतक-यांची नोंदणी सुरू करण्यात आली असली तरी, अद्याप कोणत्याही बाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतर्गत आजवर ९ हजार ३५० पेक्षा अधिक शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी खरेदी विक्री समित्यांकडे आॅनलाईन नोंदणीही केली असताना नाफेडची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे; परंतु पणन महासंघाचे जिल्हा व्यवस्थापक अद्यापही शेतक-यांना केवळ तुरीच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहनच करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांकडील तूर संपल्यानंतर ही खरेदी सुरू होणार का, अशी शंका तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम