शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Washim Unlock : निर्बंध शिथिल; पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:27 IST

Washim Unlock: पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून आणखी शिथिल करण्यात आले. वाढीव सवलतींसह नवीन नियमावलीदेखील लागू करण्यात आली. त्यानुसार, ७ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सर्वच प्रकारची दुकाने सुरू करण्यात आली; मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. बहुतांश ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पुरता फज्जा उडाला. तथापि, कोरोना संसर्गाने प्रमाण कमी झाले; मात्र संकट अद्याप टळलेले नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाने नव्याने पारित केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हाभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी केंद्र, जिम, सलून, ब्यूटिपार्लर, वेलनेस सेंटर यासह पादचारी मार्गावर थाटण्यात आलेली दुकाने सोमवारपासून सुरू करण्यात आली. दरम्यान, आस्थापना, प्रतिष्ठान चालकांसह नागरिकांनी तोंडाला मास्कचा वापर करण्यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा भारतीय दंडसंहिता १८६० मधील कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला. त्याउपरही निर्बंध शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांची पूर्णत: मोडतोड करण्यात आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. ही बाब कोरोना संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.(प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक