शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : सोन्याची बनावट नाणी विकणारे दोनजण जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 20:31 IST

वाशिम : येथील गजानन वामनराव वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची बनावट नाणी विकणाºया दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलिसांना यश मिळाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धही १८ फेब्रुवारीला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देवाशिम शहर पोलिसांची कारवाई पिवळ्या धातूची ३१० नाणी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील गजानन वामनराव वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची बनावट नाणी विकणा-या दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलिसांना यश मिळाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धही १८ फेब्रुवारीला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गजानन वानखेडे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ते १५ फेब्रुवारीला मालेगाव येथे जाण्याकरिता वाशिमच्या अकोला नाका परिसरात बसची प्रतीक्षा करित असताना त्यांच्याजवळ एक इसम आला. माझ्याजवळ प्रत्येकी २ ग्रॅमची सोन्याची नाणी असून ती तुला २ हजार रुपये प्रति नाणे याप्रमाणे देतो, असे सांगून सोन्यासारखे दिसणारे नाणे त्याने आपणास दाखविले. अधिकचे नाणे घेवून १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता अकोला नाक्यावरच भेटू, असे सांगून तो तेथून निघून गेला. फिर्यादीत नमूद अशा आशयाच्या माहितीवरून वाशिम शहर पोलिसांनी १७ फेब्रुवारीला अकोला नाक्यावर सापळा रचला. यावेळी लक्ष्मण मधुकर चव्हाण (वय ४० वर्षे, रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) याच्यासह शेरूप सत्तूजी चव्हाण (वय ४५ वर्षे, रा. सुकळी, ता. वाशिम) या दोघांनी गजानन वानखेडे यांना गाठून बोलणी सुरू केली असता, पोलिसांनी सोन्याच्या बनावट ३१० नाण्यांसह दोघांनाही ताब्यात घेतले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोन्हीही आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वाशिम शहर पोलिस करित आहे.

टॅग्स :washimवाशिम