शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम:  ‘तो’ ट्रकचालक जिल्हा सामान्य रुग्णालयातूनही फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:43 IST

तु सदर ट्रकचालक तेथूनही फरार झाल्याचा गंभीर प्रकार घडला या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: ‘लॉकडाऊन’ आणि जिल्हा सीमाबंदीनंतरही मंगरुळपीर येथून ३० मार्च रोजी राजस्थानचे ७४ कामगार घेऊन जात असलेल्या ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र ट्रकचा चालक फरार होऊन मध्यप्रदेशातील इंदोर येथे गेला आणि २० एप्रिल रोजी रात्री पुन्हा मंगरूळपीर येथे परत आला. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले; परंतु सदर ट्रकचालक तेथूनही फरार झाल्याचा गंभीर प्रकार घडला या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले.कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने सर्वच जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्यात ३० मार्च रोजी मंगरुळपीर येथून राजस्थानकडे ७४ कामगार घेऊन जात असलेला ट्रक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. ट्रॅकमधील चालक आणि ७४ कामगारांना स्थानिक जिल्हा परिषद शाळेत ठेवत प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली. दरम्यान, या ट्रकच्या चालकाने फरार होऊन थेट मध्यप्रदेशातील इंदोर गाठले; परंतु संबंधित ट्रकमालकाने त्याला परत पाठवून कोणत्याही परिस्थितीत ट्रक परत घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर हा चालक लॉकडाऊन, जिल्हा सीमाबंदीतही थेट पुन्हा मंगरुळपीर येथे पोहोचला. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामीण रूग्णालयात त्याची तपासणी केली असता त्याला ताप असल्याचे आढळून आले. दरम्यान, परजिल्ह्यातून आल्यामुळे त्याच्यावर पालिका प्रशासन, पोलिसांनी कारवाई करीत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता हा ट्रकचालक जिल्हा सामान्य रुग्णालयातूनही फरार झाला. या संदर्भात पोलिसांना रूग्णालयाने माहिती दिल्यानंतर त्याला शोधून पकडण्यात आले. तथापि, या सर्व प्रकारामुळे जिल्हा सीमाबंदी आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये ठेवले विलगीकरणातवारंवार पलायन करण्यात यशस्वी होणाºया ट्रकचालकाची गंभीर दखल पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतली असून, त्याला आता नर्सिंग कॉलेजमधील एका स्वंतत्र कक्षात कडेकोट पहाºयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या