शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : प्रकट दिनी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:10 IST

वाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला.

ठळक मुद्देजिल्हय़ातील संत गजानन महाराजांच्या संस्थानांवर भाविकांची अलोट गर्दी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला.

वाशिमचे संस्थान भाविकांनी फुललेवाशिम शहरातील जुनी आययूडीपी कॉलनीस्थित संत गजानन महाराज संस्थानवर ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांची ७ फेब्रुवारीला महाप्रसादाने सांगता झाली. यादिवशी सकाळी १२ वाजतापासून रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत खिचडी आणि बुंडीच्या लाडूंचे भाविकांना वितरण करण्यात आले. शिस्तीचा प्रत्यय देत भाविकांनीही अत्यंत शांततेत महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यासाठी संस्थानच्या सेवेकर्‍यांसह इतर भाविकांनी पुढाकार घेतला.

कवठळ येथे प्रकटदिन उत्साहात साजरामंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ७ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता गजानन महाराज मुर्तीची महापुजा कवठळ येथील नरेश देशमुख, अंजली देशमुख यांच्याहस्ते करण्यात आली. तसेच घुंगरु  महाराज यांच्याही मुर्तीचे पुजन झाले. पुरुषोत्तम सखाराम महिंद्रे यांनी साडेपाच किलो वजनाचे पंचधातुचे मुकूट संस्थानला अर्पण केले. हा सोपस्कार पार पडल्यानंतर कवठळ नगरीत ‘श्रीं’च्या पादुकांची मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर  हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ८ वाजता हभप संदिप महाराज घुगे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कवठळ, बोरव्हा, गिंभा, जामदरा, कोठारी, येथील भाविकांनी पुढाकार घेतला.

कामरगावातील भक्तांमध्येही उत्साहयेथील गजानन महाराज संस्थानवरही प्रकटदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये भाविकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. ७ फेब्रुवारीला आयोजित महाप्रसादालाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. यादिवशी गजानन महाराजांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पालखीत सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था  करण्यात आली होती. गण गण गणांत बोते  च्या गजराने कामरगाव नगरी यावेळी दुमदुमली. मिरवणुकीची सांगता  गजानन महाराज मंदिरात झाली.  त्यानंतर लगेच महाप्रसादाचे  वितरण करण्यात आले. 

‘श्रीं’च्या जयघोषाने दुमदुमले पोहा गाव!श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त येथे ७ फेब्रुवारी रोजी श्रीमद् भागवत कथा समाप्ती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३0 वाजता गावातून ‘श्रीं’ची पालखी मिरवणुक काढण्यात आली. त्यात ‘श्रीं’चा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रत्येक घरासमोर पालखीचे पुजन करण्यात आले. चौकाचौकात भाविकांसाठी चहा-पाणी व फराळाचे वितरण करण्यात आले. दुपारी १ वाजता हभप प्रमोद महाराज राहणे, रा.अटाळी यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी ३ वाजता महाप्रसादाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज भक्त मंडळ व गावकर्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

अनसिंग : प्रकटदिन महोत्सवाची सांगता!दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथील संत गजानन महाराज संस्थानवर प्रकटदिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम साजरे झाले. शेवटच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संस्थानमध्ये गेल्या सात दिवसापासून हभप शिवाजी महाराज ठाकरे यांच्या वाणीतून ज्ञानेश्‍वरी पारायणाचे वाचन झाले. याशिवाय दैनंदिन हभप भिमराव महाराज, संतोष महाराज, विशाल महाराज खोले, रामेश्‍वर महाराज गुंड, बाबुराव महाराज तडसे, हभप पद्माकर महाराज देशमुख यांचे किर्तन झाले. शेवटच्या दिवशी नरेश महाराज, आळंदी यांनी काल्याचे किर्तन सादर करून समाज प्रबोधन केले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. यावेळी सापळी, सोंडा, उमरा, वारा, जवळा, पिंपळगाव, वारला, शेलू येथील भजनी मंडळी उपस्थित होती. यानिमित्त गावातील व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून महाप्रसादाच्या कार्यक्रमात योगदान दिले. 

टॅग्स :washimवाशिमGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर