शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ग्रामपंचायतचे कुलूप तोडून घेतली विशेष सभा; पार्डीतिखे येथील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 19:36 IST

वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. 

ठळक मुद्देसभेची पूर्वसूचना दिल्यानंतरही शिपायाने केली दिरंगाईमहिला सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने उडाला सभेत गोंधळकेवळ सरपंच व काही सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली सभा; शासकीय योजनांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पार्डी तिखे ग्रामपंचायतची विशेष सभा असल्याची पूर्वसूचना ग्रामसेवक एस. के. काठोळे यांनी २५ जानेवारी रोजी दिली होती. त्या अनुषंगाने ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, ग्रामसेवक काठोळे, सदस्य, सदस्यांचे प्रतिनिधी सकाळी १०.३०  वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आले असता, शिपायाने कुलूप उघडले नसल्याचे आढळून आले. पोलीस पाटील आर.के. तिखे, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर विशेष सभेला सुरूवातीला झाली. या सभेत काही महिला सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्यासाठी आले असता, सरपंच व ग्रामसेवकांनी या प्रतिनिधींना विनंती करून विशेष सभेला केवळ सदस्यांनाच पाठवावे, असे सांगितले. यावरून काही वेळ गोंधळ झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सरपंच शेषराव अंभोरे, उपसरपंच पदमाबाई अंभोरे, ग्रामसेवक एस.के. काठोळे व काही सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. घरकुल योजना, १४ वा वित्त आयोगाचा निधी, शासनाच्या विविध योजना यासह गावविकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत