शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पतीच्या खून प्रकरणी पत्नीस सहा वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:23 IST

दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली.

ठळक मुद्देवाशिमच्या पंचशिल नगर येथे घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली. सदर हत्याकांड पंचशिल नगर परिसरातील घरकुल येथे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडले होते.

शहरातील पंचशिल नगर येथे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पती नागो भगत रात्री ८ वाजता दारु पिऊन घरी आल्यानंतर बायको, तानाबाई सोबत भांडू लागला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु असतांना पत्नी तानाबाई हिने पती नागो यास खाली पाडून मारहाण करुन गळा दाबुन जिवाने मारुन टाकले अशी फिर्याद मृतक नागो यांचे वडील उकंडी भगत यांनी शहर पोलिस स्टेशनला तब्बल १५ दिवस उशिरा २१ नोव्हेंबर २०१५ रोजी दिली. सदर प्रकरणी पोलिसांनी प्रथम मर्ग दाखल केला होता व नंतर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन तपासानंतर प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते. या प्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंत्री यांनी आरोपी पत्नी तानाबाई भगत हिस कलम ३०४मध्ये सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पाचशे रुपये दंड ,दंड न भरल्यास पुन्हा एक महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांनी बाजु मांडली.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय