शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम रेल्वे स्थानकातील तिकीटांचा गैरप्रकार तडकाफडकी बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:28 IST

वाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला. यासंदर्भात १४ जानेवारीच्या अंकात ‘रेल्वेच्या जुन्या तिकीटांवर लिहिला जातो आजचा प्रवास!’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत हा गैरप्रकार तत्काळ बंद करण्यात आला असून नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून या गंभीर प्रकाराची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.वाशिम रेल्वे स्थानकावरून अकोला, नागपूर, हैद्राबाद, काचीगुडा, पुर्णा, नांदेड, परळी, नरखेड आदिठिकाणी अनेक पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या धावतात. त्यामुळे दिवसभर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, दोनच तिकीट काऊंटर कार्यान्वित राहत असल्याने होणाºया गर्दीचा फायदा घेत रेल्वे विभागाचे काही कर्मचारी स्थानक परिसरात उभे राहून जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून देत असल्याची माहिती मिळाल्यावरून ‘लोकमत’ने या गंभीर प्रकाराची शहानिशा करण्यासाठी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता, प्रवाशांनी फेकून दिलेली तिकीटे पुन्हा वापरात आणून त्यावर पेनाने आजचा प्रवास लिहून देणारे काही कर्मचारी आढळून आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची रेल्वे विभागाने तडकाफडकी दखल घेवून सुरू असलेला प्रकार तत्काळ बंद केला. तसेच नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून या गंभीर प्रकाराची चौकशी देखील सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

वाशिम रेल्वे स्थानकावर घडत असलेला जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून देण्याचा प्रकार निश्चितपणे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी कर्मचाºयांची गय केली जाणार नाही.- राजेश शिंदेजनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे विभाग, नांदेड

टॅग्स :washimवाशिमWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन