शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग मानोरा येथे स्थानांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:24 IST

वाशिम: सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. या उपविभागाचे नाव आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मानोरा असे करण्यात आले आहे. हे कार्यालय मानोरा येथे कार्यान्वितही करण्यात आले आहे. मानोरा येथे इमारत नसल्याने हे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत कार्यरत आहे. परंतु, सद्यस्थितीत ही इमारत नादुरुस्त असून इमारतीमध्ये नवीन विद्युत मीटर बसविण्यासह इतर डागडुजीसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. नव्याने शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट रस्ते व इमारतीची कामे, पोहरादेवी विकास आराखड्याची कामे, नगरपंचायत मानोरा प्रशासकीय इमारतीचे काम आदी कामांची अंदाजपत्रके बनविण, ई-निविदा प्रपत्रे तयार करणे ही कामे तातडीच्या स्वरुपाची असल्याने या कार्यालयाचे कामकाज विश्रामगृह मानोरा येथून व संगणकावर करावयाची अंदाजपत्रके/निविदा प्रपत्रे ही कामे वाशिम येथील पूर्वीच्या कार्यालयीन इमारतीमधून उपलब्ध असलेल्या संगणकाद्वारे करण्यात येत आहेत. ७ सप्टेंबर पासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व दस्तावेज मानोरा येथे स्थानांतरीत करण्यात आले असून सदर कार्यालयाचे कामकाज मानोरा येथून तात्पुरत्या स्वरुपात शाखा अभियंता यांचे निवासस्थानाच्या इमारतीमधून सुरु करण्यात आले आहे. वीज पुरवठ्यासह इमारतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर कार्यालय पूर्ण स्वरुपात कार्यान्वित होईल. सदर कार्यालयासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराpwdसार्वजनिक बांधकाम विभाग