शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : आधार जोडणीअभावी धान्य वितरणात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:13 IST

वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्यात अद्याप ९० हजारांहून अधिक लोकांच्या आधार क्रमांकाची शिधापत्रिकांशी जोडणी झालेली नाही. त्यामुळे या प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यात अडचणी येत आहेत. 

ठळक मुद्दे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांचे वास्तव ९० हजार लोकांची आधार जोडणी बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्यात अद्याप ९० हजारांहून अधिक लोकांच्या आधार क्रमांकाची शिधापत्रिकांशी जोडणी झालेली नाही. त्यामुळे या प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यात अडचणी येत आहेत. शासनाच्यावतीने अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबांना स्वस्त धान्य वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येते. या प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडून बायोमेट्रिक मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरण करण्याचे ठरविलेले असून, या प्रणालीचा अवलंबही सुरू झाला आहे. या प्रणाली अंतर्गत सुरुवातीला राज्यातील इतर जिल्ह्यांसह वाशिम जिल्ह्यातील शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडणीचे काम करण्यात आले आहे. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतर पडताळणीदरम्यान प्राप्त आधार क्रमांक ात चुका आढळून आल्या. त्यामुळे बायोमेट्रिक मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरण होणे शक्य नसल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील १८३५४९ अंत्योदय आणि प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ६८५७१२ लोकांच्या आधार क्रमांकांची शिधापत्रिकांना जोडणी करण्याची मोहीम जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली. तथापि, या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी उलटत आला तरी, अद्यापही ९० हजार लोकांच्या आधार क्रमांकाची जोडणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत. 

आॅफलाइन वितरणाबाबत सूचना...जिल्ह्यात अद्यापही शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम पूर्ण झाले नसले, तरी बायोमेट्रिक मशीनने स्वस्त धान्य वितरणास प्रारंभ झालेला आहे. या प्रणालीत बायोमेट्रिक मशीनवर कुटुंबप्रमुखाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येत आहे. आता ज्या कुटुंबांचे आधार क्रमांक शिधापत्रिकांशी जोडले गेले नाहीत. त्या शिधापत्रिकाधारकांवर धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन नये म्हणून पुरवठा विभागाच्यावतीने प्रती ३० स्वस्त धान्य दुकानांसाठी एका कर्मचाºयाकडे जबाबदारी सोपवून आधार न जोडलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन पद्धतीने स्वस्त धान्य वितरण प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत कुटुंबाला स्वस्त धान्य वितरित केल्यानंतर संंबंधित रेशन दुकानाच्या नोंदवहीत नियुक्त कर्मचाºयांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.  

टॅग्स :washimवाशिम