शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : अर्धवट ‘घरकुल’ बांधणार्‍या १५00 जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:30 IST

वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्‍या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देविहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना रेतीघाट लिलाव रखडल्याने बांधकामात व्यत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्‍या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली. दारिद्रय़रेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे (डीआरडीए) ही योजना राबविली जाते. रमाई घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत शेकडो लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, २0१३-१४ पासून ते आजतागायत अनेक लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले नाही. यासंदर्भात १६ नोव्हेंबर २0१७ रोजी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर घरकुल योजना गांभीर्याने घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ‘अँक्शन प्लॅन’ तयार करून अर्धवट घरकुलांची शोध मोहीम जिल्हाभर राबविली. जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांचा आढावा घेऊन लाभार्थींच्या समस्या जाणून घ्या आणि घरकुलांची कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावरून जवळपास १५00 लाभार्थींना नोटीस बजावून घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थींना आता नोटीस प्राप्त होत असून, घरकुल बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत रेतीघाट लिलाव रखडल्याने बांधकामात रेतीचा व्यत्यय निर्माण होत असल्याचा दावा काही लाभार्थींनी केला. या सत्रात बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागावे अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा लाभार्थींना देण्यात आला. विहित मुदतीत बांधकाम पूर्ण न झाल्यास अनुदानाची रक्कम वसूल करणे किंवा फौजदारी कारवाई आदीचा विचार केला जाणार आहे.

अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली होती. घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थींना नोटीस बजावून विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लाभार्थींनीदेखील विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करून प्रशासनाला सहकार्य करावे.- नितीन मानेप्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम