शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

वाशिम : नव्याकोऱ्या रुग्णालय इमारती शोभेच्या वास्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:34 PM

आरोग्य केंद्राची इमारत आकारास आली; मात्र, ही रुग्णालये रुग्णसेवेत कार्यान्वित होण्यास प्रचंड विलंब लागत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुरेशा मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बहुतांशी खिळखिळी झाली आहे. तब्बल ३१ कोटी रुपये खर्चून वाशिम येथे स्त्री रुग्णालय, कारंजात उपजिल्हा रुग्णालय, शिरपूरात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आकारास आली; मात्र, ही रुग्णालये रुग्णसेवेत कार्यान्वित होण्यास प्रचंड विलंब लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय उदासिनतेमुळे नव्याकोºया या इमारती आतून, बाहेरून धूळीच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणखी किमान दीड महिना तरी हा प्रश्न रेंगाळत राहणार आहे.सन २००९-१० मध्ये मंजूर झालेल्या १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे बांधकाम वाशिम येथील चिखली सुर्वे या गावाकडे जाणाºया रस्त्यावर सन २०१२ पासून सुरू झाले. २१ कोटी रुपयांचा खर्च करून ही इमारत पूर्ण करण्यात आली. १४ फेब्रूवारी २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आॅनलाईन’ पद्धतीने या रुग्णालयाचे लोकार्पण केल्याचे भासविण्यात आले; मात्र हे रुग्णालय रुग्णसेवेत अद्यापही कार्यान्वित झालेले नाही. रुग्णालयासाठी नेमलेले दोन वैद्यकीय अधिकारी आणि काही परिचारिका सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देत आहेत. रुग्णालयासाठी आणखी बरेच मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी, विद्यमान आमदार लखन मलिक यांनी विशेष लक्ष पुरवायला हवे होते; परंतु तसे न झाल्याने हा प्रश्न निकाली निघाला नाही. कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती देखील जवळपास अशीच आहे. ७.९९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे रुग्णालय देखील अद्यापपर्यंत पूर्ण दिमतीने रुग्णसेवेत कार्यान्वित झालेले नाही. पुरेसे मनुष्यबळ नसण्यासह अन्य प्रकारच्या विविध सुविधांची वाणवा असल्याने टोलेजंग इमारत उभी होऊनही रुग्णांची गैरसोय दुर झालेली नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी या प्रश्नाकडे लक्ष पुरवायला हवे होते, असा सूर जनतेतून उमटत आहे. शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथेही ३ कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले; मात्र लोकार्पण झाले नसल्याने जुन्याच इमारतीत रुग्णसेवा सुरू असून अपेक्षित मनुष्यबळ आणि अन्य सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमीत झनक यांचा याकामी पाठपुरावा कमी पडल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

बंद इमारतीत साचली कबुतरांची विष्ठावाशिमच्या स्त्री रुग्णालय परिसरात सर्वत्र गवत व झाडेझुडपे उगवली असून आतमध्ये प्रचंड प्रमाणात धुळ व कबुतरांची विष्ठा साचून असल्याचे पाहावयास मिळाले. नजिकच असलेल्या नर्सींग कॉलेजच्या टोलेजंग इमारतीतही सर्वत्र धूळ साचत असून शासनाच्या निधीचा बहुतांशी अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम येथे स्त्री रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र या रुग्णालयासाठी आवश्यक असलेले डॉक्टर व अन्य कर्मचारी अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. काही डॉक्टर व परिचारिकांची नेमणूक झाली, ते सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देत आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल