शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:48 IST

वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देदरवर्षी कर वसुलीसाठी नगरपरिषदेच्यावतिने पथक निर्माण करुन करवसुली केल्या जाते. सूचना देवूनही कर भरणा न करणाºया ११ मालमत्ताधारकांच्या प्रतिष्ठानावर जप्ती करण्यात आली होती. याहीवर्षी १५० थकीत मालमत्ता करधारक रडारवर असल्याचे सांगण्यात आले.

- नंदकिशोर नारे वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.नगरपरिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करीता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. दरवर्षी कर वसुलीसाठी नगरपरिषदेच्यावतिने पथक निर्माण करुन करवसुली केल्या जाते. याहीवर्षी एक पथक तयार करुन कराचा भरणा करण्याबाबत जनजागृती केल्या जात आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत कराचा भरणा न केल्यास नगरपालिकेच्यावतिने जप्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वाशिम नगरपरिषदेचे करनिरिक्षक अ.अजिज अ.सत्तार यांनी दिली.  गतवर्षी कराचा भरणा करण्याच्या सूचना देवूनही कर भरणा न करणाºया ११ मालमत्ताधारकांच्या प्रतिष्ठानावर जप्ती करण्यात आली होती. याहीवर्षी १५० थकीत मालमत्ता करधारक रडारवर असल्याचे सांगण्यात आले. थकीत कराचा भरणा करुन मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन नगरपरिषदेच्यावतिने करण्यात आले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार करवसुलीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यांना साहेबराव उगले, वरिष्ठ लिपीक साहेबराव उगले, करसंग्राहक संतोष किरळकर, मनोज इंगळे, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, नाजीमभाई, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, कुणाल कनोजे, एस.एल. खान सहकार्य करीत आहेत.१५० थकीत मालमत्ताधारक कर विभागाच्या रडारवरगतवर्षी कराचा भरणा न करणाºया ३० मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये वाढ दिसत असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कराचा भरणा न करणारे १५० थकीत मालमत्ताधारक नगरपालिकेच्या रडारवर दिसून येत आहेत. यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगण्यात आले. वेळेच्या आत कराचा भरणा केल्यास मालमत्ता धारकांना लागणारे २ टक्के व्याज आकारल्या जात नाही.

८३ लाख ७६ हजार पाणी कर!नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे असलेल्या ९ कोटी ९४ लाख ७६ हजारापैकी पाणी कर ८३ लाख ७६ हजार रुपये आहे. पाणी कर न भरणाºया थकीतधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका