शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे दूध शितकरण केंद्र पुन्हा पडले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:41 IST

वाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन केंद्रांना उतरती कळा प्राप्त झाली असून दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून दूध स्विकारण्यावर विविध स्वरूपातील मर्यादा लादण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन केंद्रांना उतरती कळा प्राप्त झाली असून दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून दूध स्विकारण्यावर विविध स्वरूपातील मर्यादा लादण्यात आल्या आहेत. दुसरीकडे खुल्या बाजारातही म्हशीच्या दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिमचे दूध शितकरण केंद्र पुन्हा बंद पडले असून गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे कामही बंद आहे. १५० पैकी केवळ २ ते ३ तालुका दूध उत्पादक सहकारी संस्था सद्या कशाबशा तग धरून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रम मिळवून आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता काही वर्षांपूर्वी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसायाचा समावेश होता. शेतीला शाश्वत जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला; मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दूध खरेदी करण्याच्या प्रक्रियेत शासनाकडूनच नानाविध अटी घालण्यात आल्या. त्यामुळे दुग्धोत्पादकांसोबतच दूध उत्पादक सहकारी संस्थाही त्रस्त झाल्या.अशातच वाशिममधील दूध शितकरण केंद्राने दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून २०० लीटरपर्यंत दूध स्विकारण्याची मर्यादा लादून दिली आणि या मर्यादेत दूध येत नसल्याचे कारण समोर करून ८ ते १० दिवसांपासून दूध शितकरण केंद्र बंद करण्यात आले.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तत्कालिन शासनाने गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकºयांना भरीव अनुदान दिले. एवढेच नव्हे; तर कॅन खरेदीसाठी अनुदान, गुरांचे वेळोवेळी लसीकरण करण्यावर भर दिला. विद्यमान शासनाने मात्र दुग्धोत्पादन वाढण्यासाठी पुरक असलेल्या या सर्व बाबींवर टाच आणली आहे. त्यामुळेच दूध उत्पादक संघासह सहकारी संस्थांनीही आपले काम बंद केले आहे.- वामनराव देशमुखजिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, वाशिमवाशिमच्या दूध शितकरण केंद्राने आधी २०० लीटरपर्यंत दूध स्विकारण्याची मर्यादा लादली आणि ८ ते १० दिवसांपासून केंद्रच बंद पाडले. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. तेव्हा दुग्धोत्पादक शेतकºयांनी आंदोलने करून केंद्र सुरू करून घेतले. या प्रश्नावर लवकरच मोठे आंदोलन उभारण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत.- विशाल सोमटकरदुग्धोत्पादक शेतकरी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMilk Supplyदूध पुरवठा