शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:22 IST

बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाश्मि : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून  व्यापाºयांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. चवथ्या दिवशीही शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने ३२०० चा टप्पा ओलांडला असून, मृत्यूच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. वाशिम शहरात हजारापेक्षा अधिक एकूण रुग्णसंख्या झाल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय शहरातील व्यापारी मंडळाने १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळला जात असून, चवथ्या दिवशीही दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री वगळता उर्वरीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दुसºया दिवशीही काही दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्याने शुक्रवारी व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाच्या पदाधिकाºयांनी शहरातून फेरफटका मारत सर्वांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. नागरिकांनी आणखी तीन दिवस असेच सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळाने केले.

प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांची वर्दळवाशिम येथील बाजारपेठ बंद आहे; दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांची तुरळक वर्दळ कायम असल्याचे शनिवारी दिसून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाºयांनी सात दिवस दुकाने बंद ठेवली. त्याअनुषंगाने नागरिकांनीदेखील अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सर्वांनी शासन नियमांचे पालन करावे, गर्दी करू नये, चेहºयावर नेहमी मास्कचा वापर करावा, असे आवाहन दोन्ही व्यापारी मंडळाने शनिवारी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक