शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम: ‘नायलॉन’ मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्याला दिले  जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:45 IST

वाशिम: येथील सावली प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेनेने नायलॉन मांजाने मानेला व चोचेला जखम झालेल्या पारवा या पक्षावर उपचार करून जीवदान दिले. दरम्यान, मकर संक्रातीच्या पृष्ठभूमीवर पतंगबाजीसाठी बंदी असूनही  वापरात येत असलेला मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो, ही बाब गांभीर्याने घेत सावली प्रतिष्ठान वत्सगुल्म व वाईल्ड रेस्क्यु या निसर्ग व्यासंगी गृपने मकर ...

ठळक मुद्देसावली प्रतिष्ठान वत्सगुल्म व वाईल्ड रेस्क्यु या निसर्ग व्यासंगी गृपने मकर संक्रातीच्या अगोदरपासूनच संपूर्ण शहरात बर्ड रेस्क्यु अभियान राबविले. चेतन राठोड यांनी मांजामुळे जखमी झालेला पक्षी पाहून सावली प्रतिष्ठानच्या बर्ड रीस्क्यु टीमला संपर्क साधला. मांजामुळे मानेला व चोचेला जखम झालेल्या पक्ष्यावर उपचार करून पंखामध्ये अडकलेला सूक्ष्म मांजा काढण्यात आला.

वाशिम: येथील सावली प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेनेने नायलॉन मांजाने मानेला व चोचेला जखम झालेल्या पारवा या पक्षावर उपचार करून जीवदान दिले. दरम्यान, मकर संक्रातीच्या पृष्ठभूमीवर पतंगबाजीसाठी बंदी असूनही  वापरात येत असलेला मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो, ही बाब गांभीर्याने घेत सावली प्रतिष्ठान वत्सगुल्म व वाईल्ड रेस्क्यु या निसर्ग व्यासंगी गृपने मकर संक्रातीच्या अगोदरपासूनच संपूर्ण शहरात बर्ड रेस्क्यु अभियान राबविले. मांजामुळे मुक्या पक्षांचा जीव जाऊ नये म्हणून मांजा न वापरणयासाठी जनजागृती करण्यासोबतच मांजामुळे  जखमी झालेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी शोध मोहीम (सर्च आॅपरेशन) राबविण्यात येत आहे. यामध्ये जास्त झाडे असलेल्या परिसरात विशेष लक्ष देण्यात आले. त्यासंदर्भात सामाजिक संकेतस्थळावरुनही जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुषंगाने चेतन राठोड यांनी मांजामुळे जखमी झालेला पक्षी पाहून सावली प्रतिष्ठानच्या बर्ड रीस्क्यु टीमला संपर्क साधला. पारवा पक्ष्याची सुटका करण्यासाठी टीम सावली प्रथोमोपचाराचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाली. नायलॉन मांजामुळे मानेला व चोचेला जखम झालेल्या पक्ष्यावर उपचार करून पंखामध्ये अडकलेला सूक्ष्म मांजा काढण्यात आला. त्यांच्या या सामाजिक कार्याप्रती सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :washimवाशिम