शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींकडून ‘भाडेवसूली’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरांतर्गत रस्त्यांसह रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने उभी करायची आणि ती चक्क भाड्याने देवून अवैधरित्या वसूली करण्याचा प्रकार काही लोकांनी अवलंबिला आहे. हा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू असताना नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील ...

ठळक मुद्देअतिक्रमण विभागाचे दुर्लक्षशहरांतर्गत रस्ते गिळंकृत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरांतर्गत रस्त्यांसह रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने उभी करायची आणि ती चक्क भाड्याने देवून अवैधरित्या वसूली करण्याचा प्रकार काही लोकांनी अवलंबिला आहे. हा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू असताना नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील मुख्य रस्ते, हॉस्पिटलनजिकची मोकळी जागा, प्रशासकीय कार्यालयांशेजारच्या नगर परिषदेची मालकी असलेल्या मोकळ्या जागेवर शहरातील काही ठराविक लोकांनी अतिक्रमण केले असून टिनशेडची दुकाने उभी झाली आहेत. ही दुकाने इतरांना व्यवसाय करण्यासाठी चक्क भाडेतत्वावर देण्याचा ‘गोरखधंदा’ अलिकडच्या काळात चांगलाच फोफावला आहे. नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने या गंभीर प्रकारावर वेळीच निर्बंध लादणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

नगर परिषदेची मालकी असलेल्या मोकळ्या जागांवर चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण करून दुकाने भाड्याने दिली जात असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून अशी अतिक्रमणे प्रथम प्राधान्याने हटविण्यात येतील. - करन अग्रवाल, स्थापत्य अभियंता, अतिक्रमण व बांधकाम विभाग, नगर परिषद, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका