शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 18:30 IST

वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देविश्वास लबडे हे जिल्हा परिषद वाशिम येथे शिक्षणाधिकारी माध्यामिक या पदावर कार्यरत असताना ९४ लाख ३२ हजार निधी नियमबाहय वळती केला. याबाबत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी चौकशी समिती गठित केली होती. याबाबत गंभीर स्वरुपाची अनियमितता झाल्यामुळे विश्वास लबडे यांना जबाबदार धरण्यात आले होते.

 - नंदकिशोर नारे

वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली.

विश्वास लबडे हे जिल्हा परिषद वाशिम येथे शिक्षणाधिकारी माध्यामिक या पदावर कार्यरत असतांना त्यांनी राष्टÑीय माध्यामिक शिक्षा अभियान या योजनेसाठी प्राप्त  झालेला ९४ लाख ३२ हजार निधी वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल करुन,  तसेच आर्थीक नियम डावलून विशिष्ट हेतुने स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा वाशिम येथील चालू खात्यात नियमबाहय वळती केला. त्यामुळे शासनाचे सदर रकमेवर मिळणाºया व्याजाचे नुकसान झालेले आहे. तसेच याबाबत अभिलेख, हिशोबनस्ती, नियमानुसार ठेवलेली नव्हती. याबाबत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी चौकशी समिती गठित केली होती. सदर चौकशी समितीच्या अहवालात राष्टÑीय माध्यामिक शिक्षा अभियान योजनेसाठी प्राप्त निधी ज्या प्रयोजनासाठी आला त्यावर खर्च झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबत गंभीर स्वरुपाची अनियमितता झाल्यामुळे विश्वास लबडे यांना जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांनी विश्वास लबडे यांचेविरुध्द महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशी करण्याकरीता प्रस्ताव शिक्षण उपसंचालक अमरावती यांना १६ एप्रिल रोजी पाठविला आहे.

९४.३२ लाख निधी नियमबाहय वळती

९४.३२ लाख निधी वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल करुन सर्व नियम बाजुला ठेवून विशीष्ट हेतुने स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा वाशिम येथील चालु खातया नियमबाहय वळती केले. सदर प्रकरण जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अनेक सभांमध्ये गाजला होता. परंतु नव्यानेच आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी पेंडिग प्रकरण ताबडतोब हाती घेवून त्यातील सर्व बाजु समजून घेवून प्रकरण शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. गत काही दिवसाआधी आलेले दिपककुमार यांनी अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रकरणाचा निवाळा केल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद