शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : दिशाभूल करणा-या रोजगार सेवकाची चौकशी करा - ब्रम्हा येथील ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:22 IST

ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोजगार हमी योजना विभाग, तहसील कार्यालय आदींकडे १९ डिसेंबर रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे. 

ठळक मुद्देब्रम्हा येथील ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदनगावक-यांची दिशाभूल केली जात असल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोजगार हमी योजना विभाग, तहसील कार्यालय आदींकडे १९ डिसेंबर रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात पुढे नमूद आहे, की ब्रम्हा येथील रोजगार सेवक इंगळे हे गावक-यांकडे घरकुल, शौचालय मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी करतात. गरजूंना हेतुपुरस्सर वंचित ठेवून आपल्या मर्जीतील लोकांनाच रोजगार उपलब्ध करून देतात. १४ व्या वित्त आयोगातील निधीत अपहार केल्यामुळे संबंधित रोजगाराविरूद्ध अनसिंग पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. एकूणच या सर्व बाबींची तडकाफडकी दखल घेवून रोजगार सेवक इंगळे यांच्या कामाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. त्यावर गावातील हरीभाऊ इंगळे, यादव रणखांब, अरविंद इंगळे, प्रल्हाद मोरे, सिताराम कांबळे, विलास इंगळे, अनिल मोरे, संदिप भिसे, देवानंद कांबळे, शोभा पडघान, बबन खंदारे, सिद्धार्थ केदार, प्रताप कांबळे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत