शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:37 IST

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

ठळक मुद्देमंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. मंगरूळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशान्वये प्रथमच ‘गुगल अर्थ’ प्रणालीचा वापर करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली.

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशान्वये प्रथमच ‘गुगल अर्थ’ प्रणालीचा वापर करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. यामध्ये सदर प्लॉटवरील बांधकाम हे मार्च २०१७ पूर्वीचे निदर्शनास आल्याने मंगरूळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. तसेच या प्रकरणाशी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणातील खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे परिशिष्ट अनुच्छेद २५ ब व नोंदणी अधिनियम ३९ ब नुसार प्रतिमाह २ टक्के या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. तसेच या मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणाशी संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्याविरुद्ध मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारवाई करून त्याची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली  आहे. अशा प्रकारच्या चौकशीमध्ये प्रथमच ‘गुगल अर्थ’ सारख्या प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यामुळे सदर प्लॉटवर झालेल्या बांधकामाची माहिती आधुनिक प्रणालीच्या सहाय्याने घेऊन प्लॉटवर झालेल्या बांधकामाच्या कालावधीची माहिती मिळाली.कोणत्याही मालमत्तेची खरेदी-विक्री करताना विहित नियमांचे पालन करावे. याप्रकरणी शासनाची कोणत्याही प्रकारची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय