शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:34 IST

देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्र दाखविले बागायती जादा नुकसान दाखविण्याचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदविली.१३ व १४ फेब्रुवारी रोजी देपूळ परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, तूर, हरभरा, कांदा, आंबा, संत्रा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या चमूमार्फत सर्वेक्षणही करण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झालेल्या २० ते २५ शेतकºयांना डावलण्यात आले असून, त्यांना अपात्र लाभार्थींच्या यादीत समाविष्ट केले. तर एकाच शेतकºयाचे नाव हे  गट नंबर एकच असताना, त्याच शेतकºयाच्या पिकांचे नुकसान हे वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळे दाखविण्यात आल्याचा तसेच काही शेतकºयांच्या नावावर असलेल्या जमिनीपेक्षा जादा जमिनीचे नुकसान दाखविल्याची बाब देपूळ येथील ११ शेतकºयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली. दरम्यान, आमदार लखन मलीक यांनी महादेव ज्ञानबा वाघमारे व इतर ३ शेतकºयांच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली होती. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाच्या चमूने नेमके या चारही शेतकºयांना सर्वेक्षणातून वगळले आहे. त्यामुळे शंका-कुशंकांना पेव फुटले असून, अक्षम्य चुका करणाºयांविरूद्ध ठोस कारवाई करावी, अशी मागणी ११ शेतकºयांनी केली. देपूळ गाव परिसरातील नुकसानाचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी एकमुखी मागणी केली.दरम्यान, विहीर, पाइपलाइन, वीज पुरवठा नसणारे तसेच सिंचित जमीन नसताना बागायती दाखविणाºया शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी केली. पात्र लाभार्थ्यांना यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी महादेव वाघमारे यांच्यासह ११ शेतकºयांनी केली. शेतकºयांच्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. 

टॅग्स :washimवाशिम