शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

वाशिम : भीषण पाणी टंचाईतही भूगर्भाची चाळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:01 IST

वाशिम : पर्जन्यमानात होत असलेली घट, जलपुनर्भरणाचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाण्याचा उपसा यासह तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आणि महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने २०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका घेण्यासंबंधी निर्बंध लादूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खोलीच्या कूपनलिका (बोअरवेल) घेतल्या जात आहेत. याकडे मात्र जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. 

ठळक मुद्देकूपनलिकांची खोदकामे सुरूच प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्जन्यमानात होत असलेली घट, जलपुनर्भरणाचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाण्याचा उपसा यासह तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आणि महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने २०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका घेण्यासंबंधी निर्बंध लादूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खोलीच्या कूपनलिका (बोअरवेल) घेतल्या जात आहेत. याकडे मात्र जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, संरक्षित करणे आणि अमर्याद पाणी उपशावर बंदी घालणे अशक्य होत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जलस्रोतांची पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खोलवर गेल्यामुळे हजारो विहिरी आणि पाण्यासाठी खोदलेल्या कूपनलिकाही जलपुनर्भरण न झाल्याने कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी यंदा पुन्हा कूपनलिका घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, जास्तीत जास्त २०० फूट कूपनलिका घेण्याचा दंडक असतानाही ४०० फूटांपेक्षा अधिकच खोदले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वेळीच लक्ष पुरवून त्यावर निर्बंध लादावे, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. 

जमिनीखालचे पाणी ही कुणाचीही व्यक्तिगत मालमत्ता नाही. त्यामुळे त्यावर कुणी अधिकार सांगत असेल, तर ती चुकीची बाब आहे. महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमानुसारच जास्तीत जास्त २०० फूट खोलवर कूपनलिकांचे खोदकाम व्हायला हवे. मात्र, त्यापेक्षा अधिक खोलीच्या कूपनलिका घेतल्या जात असतील, तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे बिनदिक्कत तक्रार करावी. संबंधितांवर निश्चितपणे कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांनीही या प्रकाराकडे विशेषत्वाने लक्ष पुरवावे. तसे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले जातील.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम