शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जिल्हा परिषद सभापती पदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:24 IST

सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक अविरोध पार पडल्यानंतर, आता चार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान, सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे.वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, सभापती पदासाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंची युती झाल्याने सदर निवडणूक अविरोध झाली. हाच फॉर्म्यूला चार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं या चारही पक्षाच्या वाट्यावर प्रत्येकी एक सभापती पद येणार आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणती समिती द्यावयाची तसेच कुणाला सभापती पदी विराजमान करायचे याचा गुंता अद्याप सुटला नाही. सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राकाँचे अध्यक्षपद माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे गटाकडे आल्याने सभापती पद माजी आमदार प्रकाश डहाके गटाकडे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसमधून माजी पदाधिकाऱ्यांना सभापती पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम घोषित झाला नाही. महाविकास आघाडी व भारिप-बमसं पक्षाच्या समन्वयातून विषय समिती सभापती पदाची निवडणूकही अविरोध करण्यावर भर आहे.- चंद्रकांत ठाकरे,अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद