आसेगाव (वाशिम) : जुन्या वादावरून झालेल्या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना वारा जहाँगीर येथे रंगपंचमीच्या दिवशी, २ मार्चला रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल फिर्यादींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील सहा आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारा जहाँगीर येथील संतोष ज्ञानबा सुरडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की शुक्रवारी रात्री ८ वाजता जगदीश सुर्यभान पायघन, राजू पायघन, संजय पायघन आणि गणेश पायघन यांनी माझ्या पत्नीला शिविगाळ केली. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी काठीने मारहाण करून जखमी केले. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद चार आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. दुसºया गटातील जगदीश सुर्यभान पायघन यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी संतोष ज्ञानबा सुरडकर आणि दत्ता ज्ञानबा सुरडकर यांनी आपल्या घरी येऊन शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यावरून पोलिसांनी नमूद दोन्ही आरोपींविरूद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड करित आहेत.
वाशिम : वारा जहाँगीर येथे जुन्या वादातून मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:40 IST
आसेगाव (वाशिम) : जुन्या वादावरून झालेल्या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना वारा जहाँगीर येथे रंगपंचमीच्या दिवशी, २ मार्चला रात्री ८ वाजता घडली.
वाशिम : वारा जहाँगीर येथे जुन्या वादातून मारहाण!
ठळक मुद्देपरस्परांविरूद्ध दाखल फिर्यादींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील सहा आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड करित आहेत.