शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

वाशिम : महानगरातून परतलेल्या २७ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:25 IST

गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

वाशिम :  रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. या सर्व नागरिकांची गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नसल्यामुळे कामगार, मजूर हे गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश आदी परराज्यात तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी महानगरात रोजगारासाठी जातात. आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. त्याशिवाय जिल्ह्यातील बरीच मंडळीही महानगरात किंवा विदेशात नोकरीसाठी स्थायीक झालेली आहेत. गत तीन महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशात दीड महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. राज्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लागू आहे. परराज्यात तसेच महानगरांत रोजगारानिमित्त गेलेले २७ हजार ५०९ कामगार हे ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात आपापल्या गावी परतले आहेत. या नागरिकांची माहिती आरोग्य विभाग व पोलीस पाटलांनी घेतली असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ एप्रिलपर्यंत करण्यात आली. आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्व कामगार व मजुरांची प्रकृती ठणठणीत असून, या सर्वांवर आरोग्य विभागाचा वॉच कायम आहे.

आरोग्य कर्मचाºयांसाठी १८ हजार मास्क उपलब्धकोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकालिन कालावधीत आरोग्य विभाग रुग्णसेवेत व्यस्त असून, आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. आरोग्य कर्मचाºयांसाठी ट्रिपल लेअरचे १५ हजार मास्क तसेच एन ९५ या प्रकारातील तीन हजार मास्क उपलब्ध केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सॅनिटायझर व हॅण्डग्लोज उपलब्ध करण्यात आले. आरोग्य कर्मचाºयांसाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध केली जात आहे, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.

महानगरातून परतलेल्या कामगार, मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आजवरच्या अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.- डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वाशिम

आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर उपलब्ध केले आहे. जनतेने स्वयंशिस्त, लॉक-डाऊन व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.- चक्रधर गोटे, सभापती शिक्षण व आरोग्यजिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस