शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

वाशिम निवडणूक निकाल : लखन मलिक यांची विजयाची ‘हॅटट्रीक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:37 IST

Washim Vidhan Sabha Election Results 2019: लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला.

- सुनील काकडे  वाशिम: वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदा झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडून प्रखर विरोध होऊनही भाजपाच्या लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला. यापूर्वी तीनवेळा आमदारकीची कारकिर्द गाजविलेल्या तथा चारित्र्यावर भ्रष्टाचार, गैरव्यवहारांचा एकही डाग नसलेल्या स्वच्छ प्रतीमेच्या माणसाला मतदारांचा स्पष्ट कौल मिळाल्याचा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.जनमानसात सहज मिसळण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रिय ठरलेल्या आमदार लखन मलिक यांची अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे. लखन मलिक यांनी यापूर्वी १९९०, २००९ आणि २०१४ अशा तीनवेळच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करित आमदारकीला गवसणी घातली. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महायुती होऊनही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून शशीकांत पेंढारकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. ही बाब लखन मलिक यांना फटका देणारी ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र नियोजनबद्ध प्रचार आणि लखन मलिक यांच्या मतदारसंघातील लोकप्रियतेपुढे प्रखर विरोधही सहज मावळून त्यांचा मोठ्या फरकाने विजय सुकर झाला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. राजकारणाचा कुठलाही गंध नसताना तसेच प्रचारासाठी जेमते १५ ते २० दिवस मिळूनही डॉ. देवळे यांनी दुसºया क्रमांकाची मते मिळविली. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलेले अपक्ष बंडखोर उमेदवार शशीकांत पेंढारकर हे तिसºया क्रमांकावर राहिले; तर जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रजनी राठोड यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळविली.   विजयाचा की फॅक्टर1 स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस म्हणून लखन मलिक यांची ओळख.2 पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे कार्य व नेतृत्वावर मतदारांचा असलेला विश्वास. 3 शिवसेनेने भाजपाविरूद्ध मतदारसंघात पुकारलेले उघडउघड बंड.

टॅग्स :wadala-acवडाळाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Lakhan Malikलखन मलिक