शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:09 IST

Agriculture News : पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणीलायक क्षेत्र एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २८ जूनअखेर ३ लाख ५३ हजार हेक्टरवर आतापर्यंत विविध पिकांची पेरणी झाली आहे; तर पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन पेऱ्याला सर्वाधिक प्राधान्य दिलेले आहे. सोयाबीनचे सरासरी पेरी क्षेत्र ३ लाख ४ हजार हेक्टर असून २८ जूनपर्यंत २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. यापाठोपाठ तूर ५१६ हेक्टरवर (९४ टक्के) आणि कापूसची १८० हेक्टरवर (९४ टक्के) पेरणी आटोपली आहे. खरीप ज्वारी, मुंग, उडिद, ऊस आदी पिकांचा पेरा ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान, दमदार पाऊस आल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, असा निर्धार काही शेतकऱ्यांनी केला असल्याने अद्याप  जिल्ह्यातील १३ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाली नसल्याचे एकंदरित चित्र आहे. 

जिल्ह्यात अद्यापपर्यंत सर्वदूर तथा सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यापुर्वी पेरणीची घाई केलेल्या काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला तोंड द्यावे लागत आहे. हे प्रमाण अत्यल्प असले तरी परिस्थिती लक्षात घेता उर्वरित १३ टक्के शेतकऱ्यांनी दमदार पाऊस होऊन जमिनीत अपेक्षित ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती