शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:10 IST

राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, पहिला क्रमांक भंडारा जिल्ह्याचा असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले.

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, पहिला क्रमांक भंडारा जिल्ह्याचा असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले. तसेच पश्चिम विदर्भातील (वºहाड) बुलडाणा जिल्हा शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत राज्यात तिसºया स्थानावर आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एकही कुटुुंब शौचालयापासून वंचित राहू नये म्हणून यापूर्वीच्या पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबालादेखील शौचालय बांधून मिळावे, याकरिता पुन्हा सर्व्हे करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामातून सुटलेल्या कुटुंबाचे एकूण उद्दिष्ट २० हजार १४१ एवढे होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांच्यासह स्वच्छ भारत मिशनच्या चमूचा आढावा घेतला. मीणा यांनी ग्रामसेवकांच्या वारंवार स्वतंत्र बैठका घेऊन विहित मुदतीपूर्वी उद्दिष्टपूर्ती होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी शौचालय बांधल्यानंतर तालुका स्तरावर केवळ प्रस्ताव घेऊन पंचायत समितीमार्फत पडताळणी करणे आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वळता केला जात होता. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असल्याने मीणा यांनी तालुका स्तरावरून निधी वितरणाचे आदेश दिले. काही निवडक ग्राम पंचायतींना थेट निधी वितरीत करून त्यांच्यामार्फत शौचालयाची कामे करून घेतली. विहित मुदतीत शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती झाल्याने राज्यात वाशिम जिल्हा द्वितीय स्थानी तर अमरावती विभागात पहिल्या स्थानी आहे. भंडारा जिल्हा राज्यात पहिल्या स्थानी असून, तिसºया स्थानी बुलडाणा जिल्हा आहे. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान