शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा : लोकगिताच्या माध्यमातून एड्स नियंत्रणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 14:40 IST

वाशिम : एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ५ डिसेंबर रोजी वाशिमात सायंकाळपर्यंत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देएचआयव्ही, एड्सविषयी जिल्हाभरात जनजागृती !हस्तपत्रिका वाटप

वाशिम : एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ५ डिसेंबर रोजी वाशिमात सायंकाळपर्यंत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

वाशिम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीस सुरुवात झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किशोर लोणकर, डॉ. सुधाकर जिरवणकर, डॉ. राहुल पाटील, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. संदेश राठोड, डॉ. अवचार, डॉ. इंगळे, डॉ. पाटील, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनीष मंत्री आदी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघालेली रॅली अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी समता संदेश कलापथकच्या चमूने लोकगितांच्या माध्यमातून एड्स नियंत्रणाचा संदेश दिला. तसेच हस्तपत्रिका वाटप करून नागरिकांना एचआयव्ही, एड्स नियंत्रणाची माहिती देण्यात आली.समारोपीय कार्यक्रमात यावेळी डॉ. किशोर लोणकर यांनी उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन केले. संचालन धम्मपाल मनवर यांनी तर आभार समुपदेशक पंढरी देवळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पर्यवेक्षक रवी भिसे, आरती वानखेडे, मिलिंद घुगे, जया वानखेडे, बाबाराव भगत, अनिल राठोड, संगीता आगासे, सुलोचना मोरे, जिशा वरीद, निलंश अल्लाडा, रामा कांबळे, आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र