शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडाच्या शेतकऱ्याची  किमया: अ‍ॅपल बोराच्या आधारे लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:52 IST

सायखेडा: अवघ्या २० गुंठे क्षेत्रात अ‍ॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया सायखेडा येथील प्रगतशील युवा अल्पभूधारक शेतकरी उमेश गहुले यांनी केली आहे.

ठळक मुद्देअवघ्या २० गुंठे क्षेत्रात अ‍ॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न.गतवर्षीपासून त्यांना या अ‍ॅपल बोराचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. मागील चार वर्षांपासून ते पाच एकरातील दीड एकर शेतीत फळपिके घेत आहेत.

 

सायखेडा: अवघ्या २० गुंठे क्षेत्रात अ‍ॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया सायखेडा येथील प्रगतशील युवा अल्पभूधारक शेतकरी उमेश गहुले यांनी केली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा या सांसद आदर्श ग्रामच्या शिवारात उमेश गहुले यांची वडिलोपार्जित ५ एकर शेती आहे. लहानपणीच पित्याचे निधन झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शेतीचा भार उमेशच्या खांद्यावर आला. काही कळत नसतानाही आईला सोबत घेऊन त्यांनी शेती कसण्यास सुरुवात केली. हळहळू शेतीचे तंत्र अवगत झाल्यानंतर त्यांनी कल्पकतेच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले. मागील चार वर्षांपासून ते पाच एकरातील दीड एकर शेतीत फळपिके घेत आहेत. यामध्ये एक एकर शेतात पपईची लागवड करून त्याद्वारे त्यांनी दोन लाखांच्या जवळपास उत्पन्न घेतले, तर अर्धा एकर शेतात त्यांनी अ‍ॅपल जातीच्या बोराची झाडे लावली. गतवर्षीपासून त्यांना या अ‍ॅपल बोराचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय कमी पाण्याचा वापर करून त्यांनी झाडे जगविली. गतवर्षी त्यांना या बोराच्या उत्पादनातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदाही त्यांनी अ‍ॅपल बोराच्या विक्रीतून आतापर्यंत ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले असून, पुढे आणखी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फळपिकांशिवाय उर्वरित दीड एकर शेतीत त्यांनी सोयाबीनची पेरणी करून त्याद्वारेही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविले आहे. त्यांच्या शेतातील बोरीच्या झाडांची स्थिती पाहता किमना ६० हजार उत्पन्न मिळेल, असे दिसत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी