शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीच्या आर्थिक मदतीतून वाशिम जिल्हा वगळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:20 IST

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती.आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात २०१६ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचा प्रशासनाकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश होता. आता या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात २०१६ मध्ये एप्रिल, मे व नोव्हेंबर २०१६ आणि जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधित अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचा सर्वे कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आला आणि त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्या अहवालावरुन शासनाने ९ जानेवारी २०१७ आणि २३ मे २०१७ रोजीच्या निर्णयाद्वारे नुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती. आता सर्व विभागीय आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांनाच ही मदत मिळणार असून, ही मदत थेट संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागाकडून प्राप्त अहवालाच्या आधारे यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील मिळून ३९ हजार ६५५ शेतकºयांना ७ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार विभागातील उपरोक्त तीन जिल्ह्यांतील १६ हजार ३०३ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. प्रत्यक्षात विभागातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यातही उपरोक्त कालावधित नैसर्गिक आपत्तीने हजारो शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता; परंतु महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी