शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ११ कॉपीबहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:46 IST

वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी तब्बल ७ विद्यार्थी मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील मातोश्री सुमनताई इंगळे विद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपी करताना आढळून आले.उपशिक्षणाधिकाºयांच्या पथकाने शिवाजी विद्यालय, कोयाळी (ता.रिसोड) या परीक्षा केंद्रावर धडक देवून कॉपी करताना आढळून आलेल्या तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले.

वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी तब्बल ७ विद्यार्थी मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील मातोश्री सुमनताई इंगळे विद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपी करताना आढळून आले. दरम्यान, या केंद्राची अमरावती विभागीय बोर्डाकडे तक्रार देखील करण्यात आल्याची माहिती वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली. यंदा जिल्ह्यातील एकूण १९ हजार २२९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान, ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, महिला डाएट प्राचार्य यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांची भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार, आज पहिल्या दिवशी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील मातोश्री सुमनताई इंगळे विद्यालय या परीक्षा केंद्रावर धडक दिली. कॉप्यांचा अक्षरश: सुळसुळाट असलेल्या या केंद्रावर डॉ. नागरे यांच्या पथकाने तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. विशेष गंभीर बाब म्हणजे याच केंद्रावर मालेगाव गटशिक्षणाधिकाºयांच्या भरारी पथकाने धडक देवून आणखी तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. यासह डव्हा येथील जोगदंड विद्यालयातही कॉपी करणाºया एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. उपशिक्षणाधिकाºयांच्या पथकाने शिवाजी विद्यालय, कोयाळी (ता.रिसोड) या परीक्षा केंद्रावर धडक देवून कॉपी करताना आढळून आलेल्या तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी ११ विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिकexamपरीक्षा