शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:37 IST

७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूकीचा बिगुल वाजविला. आयोगाने निवडणूकीसाठी ७ जानेवारी २०२० चा मुहूर्त ठरविला . या मुहूर्ताची वाट पाहत बसलेल्या राजकारण्यांना दिलासा मिळाला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकारण्यांनी जिल्हाभरात राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली होती.वाशिम जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली. त्यानुसार जिल्हयात आज, १९ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५२ गट तर ६ पंचायत समिती मिळून १०४ गणाचा समावेश आहे. यामध्ये जिल्हापरिषदेच्या ५२ गटामध्ये गतवेळच्या संख्याबळानुसार सर्वाधिक सदस्य संख्या काँग्रेस पक्षाची आहे. त्या खालोखाल राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ८ सदस्य आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे ६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ४, भारिप-बमसंचे ३ तर ६ सदस्य अपक्ष होते. दरम्यान, वाशिम जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने ३० डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. तथापि, मुदतवाढ संपुष्टात आल्याने आणि निवडणूक घेणे शक्य न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईपर्यंत प्रशासकांकडूनच जिल्हा परिषदेचा कारभार हाकला जाणार आहे.अध्यक्षपद सर्वसाधारण नामाप्रसाठी राखीवराज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित करण्यात आला आहे. . आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली.असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशनपत्र सादर करणे- १८ ते २३ डिसेंबर २०१९
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ डिसेंबर २०१९
  • अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- ३० डिसेंबर २०१९
  • अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १ जानेवारी २०२०
  • मतदानाचा दिनांक- ७ जानेवारी २०२०
  • मतमोजणीचा दिनांक- ८ जानेवारी २०२०
टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद