शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा :  शौचालय बांधले; पण वापरच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:04 IST

वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. 

ठळक मुद्देकाही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. दुसरीकडे २४७ ग्राम पंचायतमध्ये शौचालयाच्या कामाची प्रगती अल्प प्रमाणात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या पाहणीतूनच समोर आले होते.

 

वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. 

राज्य शासनाने २०१९ पर्यंत राज्य हागणदरीमूक्त करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी प्रत्येक गावात व्यक्तीगत आणि सार्वजनिक शौचालये उभारण्याची मोहीम स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायततर्फे शौचालय बांधकाम मोहिम युद्धस्तरावर सुरू आहे. पात्र लाभार्थींना ग्रामीण भागात १२ हजार तर शहरी भागात १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. ग्रामीण भागाचा विचार केला तर आतापर्यंत २४४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झालेल्या आहेत. दुसरीकडे २४७ ग्राम पंचायतमध्ये शौचालयाच्या कामाची प्रगती अल्प प्रमाणात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या पाहणीतूनच समोर आले होते. हगणदरीमुक्त घोषित ग्रामपंचायतींमध्ये ‘लोकमत’ चमूने पाहणी केली असता, अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुस्थितीत आढळून आले नाही. काही ठिकाणी केवळ  बांधायचे म्हणून शौचालय बांधकाम झाल्याचे दिसून आले. वाकद येथे काही शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून आले. कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनज, पोहा, धामणी, उंबर्डा आदी ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. या शौचालयाची बिकट अवस्था असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी घाणीचे ठिगारे पाहायला मिळतात. मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील सार्वजनिक शौचालय गत काही महिन्यांपासून बंद असल्याचे दिसून आले. काही शौचालयांमध्ये अन्य साहित्य ठेवल्याचे आढळून आले. तर काही शौचालयांचा वापर नियमित होत असल्याचेही निदर्शनात आले.

टॅग्स :washimवाशिम