शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा : शेतीपयोगी अवजारांसाठी ४१०० लाभार्थींचे अर्ज प्राप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:36 IST

वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. 

ठळक मुद्दे ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.  एका महिन्याच्या आत अवजाराच्या यादीतील शासनमान्य उत्पादकांचे ट्रॅक्टर, अवजार खरेदी करुन अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.  शासनाच्या सुचनेनुसार संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून निवडपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आपल्या गावाच्या कृषि सहायकाकडे निवडपत्र देण्यात आलेले असून अर्ज केलेल्या लाभधारकांपैकी कोणाला निवडपत्र मिळाले नसल्यास, त्यांनी ते संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.निवडपत्र प्राप्त झाल्यानंतर लाभधारकांनी ट्रॅक्टर, अवजारे घेण्यासाठी पूर्वसंमती मिळण्यासाठी सातबारा, आठ-अ, अवजाराचे कोटेशन, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, अवजाराचा तपासणी अहवाल तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दहा दिवसाच्या आत अर्जासह सादर करावे. जे लाभधारक निवडपत्र दिल्यापासून दहा दिवसांच्या आत सर्व कागदपत्रासह पूर्वसंमती मिळण्यासाठीचा अर्ज सादर करतील, अशा लाभधारकांना प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार पुर्वसंमती देण्यात येईल. जे लाभधारक दहा दिवसाच्या आत पुर्वसंमतीसाठीचा प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा लाभधारकांचा प्रतीक्षा यादीतील अधिकार संपुष्टात येईल. सदर लाभधारकांना तद्नंतर पुर्वसंमती दिली जाणार नाही. पुर्वसंमती मिळालेल्या लाभधारकांना पुर्वसंमती मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत अवजाराच्या यादीतील शासनमान्य उत्पादकांचे ट्रॅक्टर, अवजार खरेदी करुन अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र